चिंचवड (पुणे) येथील ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव !
पुणे – भगवंतांचे नामस्मरण उद्धार करणारे आहे. तणावमुक्त जीवनासाठी संतांचे विचार उपयुक्त आहेत. नामस्मरण करत वारकरी पंढरपूरमध्ये येतात. पंढरपूरची वारी म्हणजे लोकधर्माचा जागर आहे, असे मत आळंदी येथील कीर्तनकार महंत पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले. ते आषाढी वारीनिमित्त चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या कीर्तन महोत्सवाच्या तिसर्या दिवशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, प्रपंचात वाद आणि परमार्थात संवाद असतो. सध्या माणसांची गर्दी वाढली आहे; पण त्यांच्यात संवाद होत नाहीत. त्यामुळे बहुतांश घरांमध्ये वाद आहेत. ते मिटवण्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक आहे.