‘नुकतेच पुणे विभागाचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना ८ लाख रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. त्यांच्या घराच्या झडतीत ६ कोटी रुपये आणि १४ बेहिशेबी मालमत्तांची कागदपत्रे सापडली. त्यामुळे प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. याकरता केवळ कायदे बनवून उपयोग नाही, तर समाजाची लोभी मानसिकता पालटण्याची आवश्यकता आहे. अन्यथा राजकीय घोषणांप्रमाणेच ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ हे दिवास्वप्नच राहील.’
– श्री. अमोल चोथे, पुणे (१४.६.२०२३)