पुणे – शहराच्या मध्यवस्तीतील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ २७ जून या दिवशी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (‘एम्.पी.एस्.सी.’च्या) स्पर्धा परीक्षेची सिद्धता करणार्या तरुणीवर तिच्या शंतनू जाधव नावाच्या मित्राने कोयत्याने आक्रमण केले. शंतनू जाधव हाही या तरुणीसमवेत ‘एम्.पी.एस्.सी.’ स्पर्धा परीक्षेची सिद्धता करत आहे. करणार्या या वेळी त्या मुलीसमवेत तिचा अन्य एक मित्र होता. आक्रमण झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावू लागली; मात्र तिच्या मागे कोयता घेऊन धावणार्या तरूणाला पाहून आरंभी कुणीच साहाय्याला पुढे आले नाही. घायाळ अवस्थेत ती मुलगी धावत होती. हे पाहून लेशपाल जवळगे नावाचा तरुण त्या मुलीच्या साहाय्याला धावला. कोयता हातात असलेला शंतनू जाधव हा मुलीच्या डोक्यात वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने त्याचा हात पकडला आणि त्याला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि आक्रमण करणार्या तरुणाला चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला कह्यात घेतले.
सौजन्य एबीपी माझा
आक्रमणामध्ये तरुणी गंभीर घायाळ झाली आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हे आक्रमण झाल्याची माहिती समोर आली असून शंतनू जाधव, असे आरोपीचे नाव आहे.
संपादकीय भूमिका
|