सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी त्‍यांना रथारूढ झालेले पाहिल्‍यावर भावजागृती होणे आणि त्‍या वेळी उन्‍हाळा असूनही उष्‍णतेचा त्रास न होणे

श्री. संपत जाखोटिया

‘११.५.२०२३ या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव गोवा येथे पार पडला. ब्रह्मोत्‍सवामध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे रथावर आरूढ झाले होते. आम्‍ही बसलो होतो, तेथे रथ जवळ येऊ लागल्‍यानंतर माझी भावजागृती झाली. तेव्‍हा माझा कंठ दाटून आला, तसेच डोळ्‍यांतून अश्रू आले. या पूर्वी माझ्‍या डोळ्‍यांतून कधी अश्रू आले नव्‍हते. या वेळी माझ्‍या डोळयांतून आपोआप अश्रू आल्‍याने मला आश्‍चर्य वाटले. महोत्‍सव चालू असतांना उन्‍हाळा असूनही मला उष्‍णतेचा त्रास झाला नाही, तसेच रथ जवळ आल्‍यावर मला गारवा जाणवला.’

– श्री. संपत जाखोटिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक