महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून माहिती उघड !
नागपूर – लहान मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांप्रकरणी (पोक्सो) गेल्या ५ मासांत मुंबईत तिप्पट गुन्हे नोंद झाले आहेत. नागपूर आणि पुणे शहरात मात्र पोक्सो गुन्ह्यांवर नियंत्रण आहे. मुंबईत ५ मासांत ३९० गुन्हे नोंद झाले आहेत, तर पुणे येथे ८७ आणि नागपूर येथे ५२ गुन्हे नोंद आहेत, ही माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून उघड झाली आहे. (केवळ गुन्हे नोंद होऊन उपयोग नाही, तर संबंधित आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकतो ! – संपादक)
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींमध्ये सर्वाधिक नातेवाईक, मित्र, प्रियकर, ओळखीची व्यक्ती, प्रशिक्षक-शिक्षक यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मुलींना आमिषे दाखवून अश्लील चाळे किंवा थेट शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. अनेकदा दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी किंवा अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केला जातो. अनेक प्रकरणांत आरोपी हे नातेवाईक असल्यामुळे पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरणे पोचतच नाही. तक्रार देण्यासाठी आलेल्या पालकांकडून तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात. (अशा कर्तव्यचुकार पोलिसांना पदच्युतच करायला हवे ! – संपादक) त्यामुळे आरोपींचे धैर्य वाढते.
संपादकीय भूमिका :लहान मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचारांचे प्रकरण यावरून मुंबई शहर लहान मुलांसाठी किती असुरक्षित आहे, हे लक्षात येते ! |