पट्टणमतिट्टा (केरळ) – येथील तिरुवल्ला न्यायालयाबाहेर एका ५५ वर्षीय व्यक्तीने न्यायाधिशाच्या गाडीची तोडफोड केली. त्याच त्याच्या पत्नीसमवेत असलेल्या वादावर न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे संतप्त होऊन त्याने हे कृत्य केले. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीचे म्हणणे आहे की, ‘मी घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
Unhappy with divorce proceedings, a 55-year-old man damaged a family court judge’s car in the Thiruvalla court complex in #Kerala | @KGShibimol https://t.co/xo7nioRkhN
— IndiaToday (@IndiaToday) June 22, 2023
मी न्यायालयात स्वतःचा युक्तीवाद स्वतःच करत होतो; मात्र न्यायालयाने माझी याचिका फेटाळून लावली. न्यायाधीश आणि पत्नीचे अधिवक्ता एकत्रित माझ्या विरोधात काम करत आहेत. त्यांनी माझी बाजू समजून घेतली नाही.’’