मुंबई – वर्ष २०२२ मध्ये दसर्याला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाने वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये ‘दसरा मेळावा’ घेतला. यासाठी ३ सहस्र बसगाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या, तसेच अनेकांना राज्यशासनाच्या एस्.टी. बसगाड्यांनी स्थळावर विनामूल्य आणण्यात आले. या कार्यक्रमासाठी एकूण १० कोटी रुपये खर्च झाला, असा आरोप याचिकाकर्त्याने केल्याने न्यायालयाने याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता नितीन सातपुते यांनी न्यायालयात आपली बाजू मांडतांना मेळाव्यासाठी एस्.टी., तसेच खासगीने वाहने मागवल्याने, मुंबई विद्यापिठाची जागा भाड्याने घेतल्याने हा व्यवहार रोख झाला वा ऑनलाईन झाला, याची तपशीलवार चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर न्यायालयाने ‘मुद्दे रास्त असतील, तर प्रतिज्ञापत्र सादर करा’, असे निर्देश याचिकाकर्त्याला दिले.