बाभुळगाव (जिल्हा अकोला) येथे सामाजिक माध्यमावर छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !

(‘स्टेटस’ म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या स्वतःच्या खात्यावर ठेवलेले चित्र किंवा लिखाण)

धर्मांध आशिम खान पठाण (उजवीकडे)

अकोला – शहरापासून जवळच असलेल्या बाभुळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप ‘स्टेटस’ ठेवणारा धर्मांध आशिम खान पठाण (वय २५ वर्षे) याला पोलिसांनी १६ जूनच्या रात्री अटक केली.

सौजन्य: ABP MAJHA

याविषयी शिवसेनेचे पदाधिकारी आणि गावकरी यांनी आक्षेप घेत तरुणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन क्षमा मागण्यास सांगितले. गावातील तरुण एकत्र आल्यामुळे भीतीपोटी तरुण लपून बसला होता; परंतु तो क्षमा मागण्यास सिद्ध नव्हता. (उद्दाम धर्मांध ! पोलिसांनी अशा धर्मांधांवर आतापर्यंत कठोर कारवाई न केल्यामुळे ते राष्ट्रपुरुषांची सर्रासपणे विटंबना करत आहेत ! – संपादक) त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हे लक्षात घेऊन शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने गावात बंदोबस्त ठेवला.

संपादकीय भूमिका

गेल्या काही मासांपासून महाराष्ट्रात धर्मांधांकडून अशा प्रकारे राष्ट्रपुरुषांचा अवमान आणि मोगलांचे तुष्टीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. सरकारने अशा धर्मांधाना आजन्म कारावासाची शिक्षा केल्याशिवाय असे अपप्रकार थांबणार नाहीत !