सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले असतांना कु. किरण व्हटकर यांना गुरुकृपेने त्यांना प्रसाद आणि महाप्रसाद देण्याची सेवा मिळाली. त्या वेळी त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची अनुभवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. दुसर्यांना समजून घेण्याची वृत्ती आणि सहजता
मी : ‘महाप्रसाद व्यवस्थित आहे ना ?
सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका : हो.
मी : महाप्रसादात काही अल्प-अधिक होते का ? तसे असेल, तर मला सांगा.
सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका : थोडा अंदाज आल्यावर सांगतो.
तेव्हा मला सद़्गुरु काकांमधील दुसर्यांना समजून घेण्याची वृत्ती आणि सहजता शिकता आली.
२. इतरांना परिपूर्ण घडवणे
‘प्रत्येक संतांची इतरांना घडवण्याची पद्धत वेगळी असते’, असे काही जणांकडून ऐकले होते. सद़्गुरु काकांच्या सेवेत मला ते अनुभवता आले. त्यांना सेवेतील चुका विचारल्यावर ते त्याविषयी विशेष काही सांगत नसत. त्यांनी त्याविषयी काही न सांगितल्याने थोड्या वेळात सेवेविषयी स्वतःच्या मनाचे चिंतन चालू व्हायचे. यातून देवाला ‘चिंतन करून मी परिपूर्ण सेवा करणे’, हेच मला शिकवायचे होते.
३. पोटाचे शस्त्रकर्म झाले असूनही सकारात्मक रहाणे
सद़्गुरु काकांचे पोटाचे शस्त्रकर्म झाले. तेव्हा ‘सद़्गुरु काका, तुम्ही कसे आहात ?’, असे त्यांना विचारल्यावर ते मला म्हणायचे, ‘‘मी बरा आहे. कसा वाटतो बघा ? मला या कालावधीत कधीच थकवा येत नाही. देवाने मला कधी थकवा दिलाच नाही.’’
– कु. किरण व्हटकर (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.८.२०२१)