‘चॅटजीपीटी’चे निर्माते सॅम ऑल्टमन यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट !

सॅम ऑल्टमन आणि पंतप्रधान मोदी

नवी देहली – ‘ओपनएआय’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ‘चॅटजीपीटी’चे निर्माते सॅम ऑल्टमन हे दोन दिवसांच्या भारत दौर्‍यावर असतांना त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीविषयी ऑल्टमन यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, भारतासमोर असणार्‍या संधी, त्यासाठी भारताने काय काय केले पाहिजे ?, तसेच चढ-उतार रोखण्यासाठी जागतिक नियमन करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाली.

पंतप्रधान मोदी यांनीही ऑल्टमन यांना ट्वीट करून धन्यवाद दिले.

मोदी म्हणाले की, भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढवण्यासाठी ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मध्ये (कृत्रिम बुद्धीमत्तेमध्ये) पुष्कळ मोठी क्षमता आहे. ती क्षमता विशेषतः तरुणांमध्ये आहे. आम्ही अशा सर्व गोष्टींचे स्वागत करू ज्या आमच्या डिजिटल परिवर्तनाला गती देऊ शकतात.