मणीपूरमध्ये आतापर्यंत ९०० शस्त्रे जप्त

इंफाळ (मणीपूर) – येथे गेल्या एक मासापासून चालू असलेल्या हिंसाचारानंतर पोलीस, सैन्य आणि अर्धसैनिक दले यांनी चालवलेल्या शोध मोहिमेतून आतापर्यंत एकूण ९०० शस्त्रे अन् ११ सहस्र ५१८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

जप्त करण्यात आलेली बहुतांश शस्त्रे ही स्वयंचलित आहेत. त्यासह काही मोर्टार, तसेच हँड ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहेत.