लव्‍ह जिहाद्यांना तात्‍काळ फासावर लटकवावे, तसेच देशात तात्‍काळ ‘लव्‍ह जिहादविरोधी’ कायदा करावा !

पुणे जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन सादर !

जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देतांना उजवीकडून समितीचे श्री. प्रशांत मुकादम, श्री. कृष्‍णा पाटील आणि श्री. पराग गोखले

पुणे – देहलीमध्‍ये साक्षी आणि झारखंडमध्‍ये अनुराधा अशा अनेक हिंदु मुलींची हत्‍या करणार्‍या लव्‍ह जिहाद्यांना तात्‍काळ फासावर लटकवा. पुणे जिल्‍ह्यातील मंचर या गावात घडलेल्‍या अल्‍पवयीन हिंदु मुलीवरील भयावह अत्‍याचाराच्‍या निषेधार्थ ५ जून या दिवशी मंचर येथे झालेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनातील मागण्‍यांची शासनाने त्‍वरित नोंद घ्‍यावी, तसेच देशात तात्‍काळ लव्‍ह जिहादविरोधी कायदा करावा, या मागणीसाठी ६ जून या दिवशी जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देण्‍यात आले. या वेळी पुणे  येथील जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा दंडाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निवेदन स्‍वीकारले.

चर्चेच्‍या वेळी मंचर गावातील पीडित मुलीवर झालेल्‍या अत्‍याचाराचे गांभीर्य भयानक आहे, हे त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍यांच्‍या बोलण्‍यातून लक्षात आल्‍याचे हिंदु जनजागृती समितीचे समन्‍वयक श्री. पराग गोखले यांनी सांगितले. या वेळी समितीचे सर्वश्री कृष्‍णा पाटील, प्रशांत मुकादम, शशांक सोनवणे, तसेच धर्मप्रेमी श्री. दत्तात्रय कुलकर्णी, श्री. अंकुश जगताप, श्री. शुभम डोणवाडे, श्री. शिवराज डोणवाडे, श्री. देव बुर्‍हाडे आदी उपस्‍थित होते.