निष्पाप हिंदु तरुणांवर कारवाई केल्यास त्याचा परिणाम चांगला होणार नाही ! – वज्रदेही स्वामीजी यांची चेतावणी

मंगळुरू येथे धार्मिक हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांकडून धर्मांधताविरोधी पथकाची स्थापना

श्री वज्रदेही राजशेखरानंद स्वामीजी

मंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या मंगळुरू येथे धर्मांधताविरोधी पथक स्थापन करण्यात आले आहे. मंगळुरूच्या गुरुपूर येथील श्री वज्रदेही राजशेखरानंद स्वामीजी यांनी यासंदर्भात चेतावणी दिली आहे. स्वामीजी म्हणाले, ‘सरकारने तणाव रोखण्यासाठी समाजात फूट पाडू नये. एक भगिनी धर्मांधांच्या हातात सापडल्यास हिंदू केवळ बघत रहाणार नाहीत. निष्पाप हिंदु युवकांना कह्यात घेतल्यास त्याचा परिणाम चांगला होणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून प्रतिकार करण्यात येईल.’

राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर या पथकाविषयी म्हणाले की, दक्षिण कन्नड जिल्ह्यात कायदा हातात घेतला जातो. त्यामुळे विभागाचे आणि जिल्ह्याचे नाव अपकीर्त होते. अशा घटनांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी या पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंना वाईट दिवस आले आहेत, हे लक्षात घ्या !