लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील न्यायालयात गुंडाची गोळ्या झाडून हत्या !

डावीकडून दुसऱ्यास्थानी संजीव माहेश्‍वर जीवा

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील न्‍यायालयात अज्ञातांनी संजीव माहेश्‍वर जीवा या गुंडाची गोळ्‍या झाडून हत्‍या केली. या वेळी एका लहान मुलालाही गोळी लागल्‍याने तो घायाळ झाला. गोळीबार करणारे अधिवक्‍त्‍यांच्‍या वेशभूषेत आले होते. पोलिसांनी या पैकी विजय यादव या आरोपीला पळून जातांना अटक केली. संजीव उत्तरप्रदेशातील आमदार ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी अटकेत होता. (अशांवर जलद गती न्‍यायालयात खटला चालवून त्‍यांना फाशीची शिक्षा होण्‍यासाठी प्रयत्न झाला, तर अशा घटना रोखल्‍या जातील ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

भर न्‍यायालयात अशा प्रकारच्‍या घटना घडणे म्‍हणजे गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक नसल्‍याचेच दर्शक होत !