हिंदु तरुणाच्या कपाळावर टिळा लावल्याने मुसलमान तरुणावर स्थानिक मुसलमानांकडून सामाजिक बहिष्कार !

दमोह (मध्यप्रदेश) येथील घटना !

दमोह (मध्यप्रदेश) – निवडणुकीच्या प्रचासभेत एका हिंदु तरुणाला गुलालाचा टिळा लावल्यावरून आरिफ शाह या मुसलमान तरुणावर स्थानिक मुसलमानांनी बहिष्कार घातला. या तरुणाच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर एकही मुसलमान त्याच्या घरी गेला नाही. त्याला अन्य मुसलमान घरीही बोलावत नाही. या तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस चौकशी करत आहेत. गेल्या वर्षभरापासून हा बहिष्कार चालू असल्याची माहिती समोर आली आहे. आरिफने आरोप केला आहे की, बहिष्कार घालणार्‍यांनी त्याच्या (आरिफच्या) भूमीवर अवैध नियंत्रण मिळवण्याचाही प्रयत्न केला होता.

संपादकीय भूमिका

या घटनेच्या उलट एखाद्या हिंदूने मुसलमानाला साहाय्य केल्याने हिंदूंनी त्याच्यावर सामाजिक बहिष्कार घातला असता, तर हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवण्यात आले असते; मात्र येथे बहिष्कार घालणारे मुसलमान असल्याने सर्व राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी संघटना मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !