१. नवीन पनवेल येथील कु. सिद्धार्थ मच्छिंद्र पवार याला ९१.२० टक्के गुण मिळाले आहेत. सनातनची सात्त्विक उत्पादने तो संबंधितांपर्यंत वेळेत पोचवतो. तो ग्रंथ प्रदर्शनाच्या सेवेमध्ये प्रासंगिक सहभागी होतो. अभ्यासाला बसण्यापूर्वी तो कुलदेवतेचा नामजप करत असे.
२. ठाणे येथील कु. श्रावणी कैलास पेंडभाजे हिला ९१.८० टक्के, तर मुंबई येथील कु. चैताली दीपक राणे हिला ९९.४० टक्के गुण मिळाले आहेत.
३. पेण (रायगड) येथील कु. नंदिता संतोष दिवेकर हिला ९३.६० टक्के गुण मिळाले आहेत. ‘अभ्यासाला बसण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्री गणपति यांना प्रार्थना करत होते. त्यामुळे अभ्यासाचे लवकर आकलन झाले. प्रार्थनेमुळे परीक्षेविषयीची भीती नाहीशी झाली’, असे नंदिताने सांगितले.