पुणे, सोलापूर आणि सातारा येथे झालेल्या ‘हिंदु एकता दिंडी’त हिंदु ऐक्याचा अभूतपूर्व आविष्कार !
सोलापूर – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पुणे, सोलापूर आणि सातारा येथे २८ मे या दिवशी झालेल्या ‘हिंदु एकता दिंडी’त हिंदु ऐक्याचा अभूतपूर्व आविष्कार पहायला मिळाला. सोलापूर येथील दिंडीत १० सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते आणि सातारा येथील दिंडीत सहस्रो जिज्ञासू, धर्मप्रेमी अन् हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. विविध ठिकाणी पार पडलेल्या या दिंड्यांमध्ये समाजाचा लाभलेला सहभाग हा समाजात सनातन संस्थेप्रती वाढत चाललेला विश्वास आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची सर्वत्र दुमदुमत असलेली आध्यात्मिक कीर्ती यांचा प्रत्यय देणारा ठरला. पुणे येथील दिंडीसाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांची, तर सोलापूर येथील दिंडीसाठी पू. दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.