जे.एन्.यू.मध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला साम्यवादी विद्यार्थी संघटनेचा विरोध !

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये (जे.एन्.यू.मध्ये) ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होतेे. या वेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस्.एफ्.आय.) या साम्यवादी विद्यार्थी संघटनेने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे विशेष प्रदर्शन आयोजित केले होते.

१. एस्.एफ्.आय.ने म्हटले की, या प्रदर्शनाचा आम्ही निषेध आणि विरोध करतो. हा चित्रपट धर्मनिरपेक्षतेला कलंकित करत आहे. हा चित्रपट रा.स्व. संघाचा अजेंडा (धोरण) आहे.

२. सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी आधीच फेटाळून लावली आहे. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यासही न्यायालयाने नकार दिला.

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून चित्रपटाला ‘केवळ प्रौढांसाठी’ असे  प्रमाणपत्र प्रदान

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला प्रमाणपत्र दिले आहे. ते देतांना ‘केवळ प्रौढांसाठी’ असे म्हटले आहे, म्हणजे १८ वर्षांवरील लोकच हा चित्रपट पाहू शकतात. प्रमाणपत्र देतांना चित्रपटांतील काही प्रसंगांत पालट करण्यासही सांगण्यात आले आहे. त्यात मुसलमान व्यक्ती हिंदूंच्या देवतांना अवमान करणारी विधाने करतो, हे काढण्यात आले आहे. भारतातील कम्युनिस्टांच्या दुटप्पी नीतीविषयीच्या विधानातून ‘भारतीय’ शब्द काढण्यात आला आहे.

केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंद यांनी ‘केरळ राज्य इस्लामी राज्य बनेल’ असे भाकीत वर्तवले होते. ते वाक्य हटवण्यात आले आहे. एकूण १० प्रसंगांमध्ये पालट करण्यात आल्यानंतर या चित्रपटाला हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका 

साम्यवादी हे हिंदुद्वेषी आणि जिहादीप्रेमी असल्याने ते अशा चित्रपटांना विरोध करणारच ! असे पक्ष आणि त्यांच्या संघटन यांच्यावर देशात बंदी घालण्यासाठी हिंदु संघटनांनी चळवळ राबवणे आवश्यक !