पू. डॉ. आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांच्‍या नावे बनावट पत्र प्रसारित करणार्‍या तरुणाला पुणे येथून अटक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे पद्मश्री पुरस्‍काराने सन्‍मानित ‘महाराष्‍ट्र भूषण’ ज्‍येष्‍ठ निरूपणकार पू. डॉ. आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांच्‍या नावे आवाहन करणारे खोटे पत्र २२ एप्रिल या दिवशी सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाले होते. या प्रकरणी रायगड गुन्‍हे अन्‍वेषण शाखेच्‍या पथकाने शुभम काळे याला पुणे येथून अटक केली आहे. अलिबाग न्‍यायालयाने या संशयित आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्‍ठानच्‍या वतीने पू. डॉ. आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली होती. त्‍यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्‍यात अज्ञाताच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता. या प्रकरणात आणखी काही जणांना पोलीस कह्यात घेण्‍याची शक्‍यता आहे.