‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. पार्थ राजू जंगम हा या पिढीतील एक आहे !
खेड (जि. रत्नागिरी) येथील कु. पार्थ राजू जंगम याचा आज १७.४.२०२३ या दिवशी नववा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.
कु. पार्थ राजू जंगम याला नवव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
(वर्ष २०१६ मध्ये कु. पार्थ राजू जंगम याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. आता वर्ष २०२३ मध्येही आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे. – संकलक)
१. साहाय्य करणे
‘कु. पार्थ इतरांना साहाय्य करतो. कुणी रुग्णाईत असल्यास तो त्यांनाही साहाय्य करतो.
२. देवाची आवड आणि धर्माचरण
शाळेत जातांना पार्थ नेहमी स्वतःच्या कपाळावर टिळा लावून जातो. सायंकाळी तो देवाजवळ दिवा लावतो आणि ‘शुभं करोति’ म्हणतो. तो मारुतीला नमस्कार करतो.
३. वर्गातील मुलांनी खोटे बोलू नये; म्हणून प्रयत्न करणे
शाळेत पार्थच्या वर्गातील मुले खोटे बोलत असतील, तर ‘खोटे बोलणे चुकीचे आहे’, असे सांगून ‘खोटे बोलल्यावर देवबाप्पा आपल्याला शिक्षा करील’, असे तो सांगतो.
४. पार्थमध्ये जाणवलेले पालट
पार्थमधील हट्टीपणा न्यून झाला असून त्याच्यात प्रेमभाव आणि समजूतदारपणा वाढला आहे. त्याला चुका दाखवून दिल्यास त्या तो मान्य करतो आणि चुकीसाठी कान पकडून क्षमा मागतो.
५. अनुभूती
‘देवाकडे पाहिल्यास मला शक्ती जाणवते’, असे पार्थ सांगतो.
६. पार्थमधील स्वभावदोष
ऐकण्याची वृत्ती नसणे.’
– श्री. राजू जंगम (कु. पार्थचे वडील), खेड, रत्नागिरी. (७.५.२०२२)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |