रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प्रक्रियेसाठी गेल्यावर आश्रमातील चैतन्य आणि तेथील  साधिकांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे वागण्यात सहजता येणे

१. रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी मनात पुष्कळ प्रतिक्रिया येणे आणि इथे आल्यावर साधक स्वतःपेक्षा इतरांचा विचार करत असून त्यांना समजून घेत असल्याचे जाणवणे

सौ. नीला जहागीरदार

रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी माझ्या मनात पुष्कळ प्रतिक्रिया यायच्या. एकदा आश्रमातील मार्गिकेत मी एका साधकाशी वाट अडवून बोलत होते. माझ्या मागे असलेल्या साधिकेला मार्ग मोकळा करून द्यावा, हे माझ्या उशिरा लक्षात आले. आता ती साधिका मला रागावेल, असे मला वाटले. मी तिच्याकडे पाहिले, तर ती साधिका स्मितहास्य करत मलाच विचारत होती, काकू, काही हवे आहे का ? तेव्हा मला हे प्रकर्षाने जाणवले, इथे साधक स्वतःपेक्षा इतरांचा विचार करतात आणि त्यांना समजून घेतात. इथे साधकांच्या मनात प्रतिक्रिया येतच नसाव्यात.

२. स्वभावदोषांची व्याप्ती काढून स्वयंसूचना सत्र करूनही न जमलेल्या कृती साधकांचे प्रेम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य यांमुळे जमू लागणे अन् त्यात सहजता येऊन पुष्कळ आनंद मिळणे

जे मला स्वभावदोषांची व्याप्ती काढून आणि स्वयंसूचना सत्र करूनही जमले नव्हते, ते कृती अन् साधकांचे प्रेम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य यांमुळे जमू लागले अन् त्यात सहजता आली. मला पुष्कळ आनंद मिळाला आणि कृतज्ञता वाटली. आताही मला थोड्या प्रतिक्रिया येतात; पण माझा अभ्यास चालू होतो की, मी या साधकांसाठी काय करू ? त्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळतो.

३. आश्रमातील प्रत्येक वस्तू आणि जीव चैतन्याने भारित आहे, असे वाटणे

आश्रमात प्रत्येक वस्तू आणि जीव हा गुरुदेवांप्रती कृतज्ञ आहे, गुरुदेवांना समर्पित आहे, तसेच चैतन्याने भारितही आहे. स्वयंपाकघरातील भांडी, त्यात तर इतके चैतन्य आहे की, संवाद साधायचा म्हटले, तर प्रत्येक भांडे बोलू लागेल.

४. स्वयंपाकघरातील तरुण मुलींकडून सेवा भावपूर्ण करून योग्य नियोजन कसे करायचे, हे शिकता येणे

स्वयंपाकघरात सेवा कशी करायची ? प्रत्येक वस्तू भावपूर्ण कशी हाताळायची आणि ठेवायची ?, हे मला इथे आल्यावर स्वयंपाकघरातील तरुण मुलींनी शिकवले. येथील नियोजनाचा भाग अगदी परिपूर्ण असतो. साधकांच्या सेवेचे एक मिनिटही नियोजन होऊ शकले नाही; म्हणून वाया जात नाही.

गुरुदेवा, आपली अपार कृपा आम्ही साक्षात् या वैकुंठात अनुभवत आहोत. माझे सर्व स्वभावदोष आणि अहंचे पैलू हे आपल्याच कृपेने दूर होऊन केवळ आपल्या चरणांशी समर्पित होता येऊ दे. मी कृतज्ञता व्यक्त करण्यास असमर्थ आहे. ॐ

–  सौ. नीला जहागीरदार (वय ७० वर्षे), नागपूर (६.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक