भारताच्या नोटिसीनंतर पाकिस्तान सिंधु जल करारातील सुधारणेवर चर्चा करण्यास सिद्ध !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – सिंधु जल करार १९६० मध्ये सुधारणा करण्याच्या मागणीच्या संदर्भातील नोटिसीवर पाकने उत्तर पाठवले आहे. भारताने यावर्षी २८ जानेवारीला हॉलंडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयातील सुनावणीच्या वेळी ही नोटीस पाकला पाठवली होती. पाकने नोटिसीच्या उत्तरात म्हटले आहे की, सिंधु जल कराराच्या संदर्भात भारताचे म्हणणे ऐकण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.

वर्ष २०१७ ते २०२२ या काळात भारताने कराराविषयी ५ बैठका घेतल्या होत्या. त्यात पाकने कधीच भारताची सूत्रे स्वीकारली नाही. त्यामुळेच भारताने पाकला नोटीस बजावली होती.