नवी देहली – देहलीतील शास्त्री पार्क परिसरात रामनवमीच्या दिवशी लावण्यात आलेल्या भगव्या ध्वजांचा अवमान केल्याच्या प्रकरणी अझीम नावाच्या मुसलमान व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.
रात के अंधेरे में रामनवमी पर लगे भगवा झंडों को नोंचा, पैरों से कुचला… वीडियो वायरलः दिल्ली पुलिस ने अजीम को किया गिरफ्तार#DelhiPolice https://t.co/UsPMxAgWur
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 5, 2023
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
४ एप्रिल या दिवशी रात्री ९ वाजता सागर नावाच्या व्यक्तीने अझीम याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सागर यांनी तक्रारीत म्हटले होते, ‘रात्री १२.३० च्या सुमारास ‘ब्लॉक स्ट्रीट’च्या परिसरात छोटे भगवे ध्वज लावण्यात आले होते. अझीम याने ते झेंडे काढून त्यांतील काही झेंडे फाडले, काही पायाने तुडवले आणि काही जवळच्या नाल्यात फेकून दिले.’ त्याच्या या कृत्याचा कुणी तरी व्हिडिओ बनवला. तो सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. त्यानंतर अझीम याच्या विरोधात कलम १५३ अ (दोन धार्मिक गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे) आणि कलम २९५ अ (हेतूपुरस्सर एका धार्मिक गटाच्या श्रद्धांचा अवमान करणे) या कलमांखाली गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली.