दासमारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दासमारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेतांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

योगिता घाटे

१. जाणवलेली सूत्रे

अ. ‘मूर्तीकडे पहातच रहावे’, असे मला वाटले. ‘माझे मन तृप्त झाले आहे’, असे मला जाणवले.

आ. मला एक वेगळ्याच प्रकारची आत्मिक शांतता अनुभवायला आली.

इ. मारुतिरायाच्या मूर्तीत भक्ती आणि आनंद यांची स्पंदने जाणवत होती.

ई. माझे मन पूर्णपणे निर्विचार झाले होते.

उ. मारुतिरायाची नमस्काराची मुद्रा पाहून मला त्याच्या मनात असलेला श्रीरामाप्रतीचा अत्यंत उत्कट भाव जाणवला आणि त्या वेळी तेथे प्रभु श्रीरामाचे अस्तित्वही जाणवले.

ऊ. ‘मारुतीची मूर्ती साकारलेली शिळा किती भाग्यवान आहे !’, असे मला वाटले. ‘भगवंताने त्याचे रूप देऊन माझे सार्थक केले’, असा कृतज्ञतेचा भाव त्या शिळेतून जाणवत होता. ‘मूर्तीकाराने कोणता भाव ठेवून ही मूर्ती घडवली असेल !’, असा विचार माझ्या मनात आला.

२. आलेल्या अनुभूती

२ अ. मूर्ती सजीव असल्याचे जाणवणे : मला मारुतिरायाच्या हातांच्या बोटांची हालचाल होतांना जाणवली. त्याची नखे पुष्कळ तेजस्वी दिसत होती. ‘त्याच्या बोटांच्या अग्रभागातून वातावरणात पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. त्याच्या मुखावर भक्तीसहित सुंदर हास्य दिसत होते. त्या मूर्तीत सजीवता जाणवत होती.

२ आ. काही क्षणांसाठी मला ‘माझ्या ठिकाणी सीतामाताच आहे’, असे जाणवून माझे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘त्या स्थितीतून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते.

‘केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे हे सुंदर क्षण मला अनुभवायला मिळाले’, याबद्दल त्यांच्या कोमल चरणी शब्दातीत कृतज्ञता ! ‘हे गुरुराया, मारुतिरायासारखा उत्कट भाव आम्हा साधकांमध्येही निर्माण होऊ दे’, हीच आपल्या कोमल चरणी आर्त प्रार्थना.’

– योगिता घाटे, सनातन आश्रम, फोंडा, गोवा. (६.१२.२०२१)