सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रत्येक कृतीमधून अनुभवू लागल्यापासून साधिकेला हलकेपणा जाणवून आनंद मिळणे आणि ‘परात्पर गुरुदेव आपल्या समवेतच आहेत’, असे जाणवणे
‘काही दिवसांपासून मी भावाच्या स्तरावर प्रयत्न करत आहे. एकदा मी ‘परात्पर गुरुदेव माझ्या हृदयातच आहेत आणि ते माझ्याकडे पहात आहेत’, असा भाव ठेवला. त्या दिवसापासून मला चांगले वाटू लागले. मी परात्पर गुरुदेवांना प्रत्येक कृतीमधून अनुभवू लागले आणि त्यातून मला आनंद मिळू लागला. मी त्यांच्याशी मनातून बोलते, त्यांना प्रार्थना करते, त्यांना चुका सांगते आणि त्यांना आत्मनिवेदन करते. असे केल्याने मला हलकेपणा जाणवून आनंद मिळतो. तेव्हा ‘परात्पर गुरुदेव आपल्याच समवेत आहेत’, असे मला सतत वाटू लागते.
२. साधिकेला ध्यानात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले ध्यानमंदिरात बसलेल्या साधकांसाठी स्वतः नामजप करत असल्याचे आणि त्यांच्यामध्ये भाव निर्माण करून प्रीतीचा वर्षाव करत असल्याचे दिसणे
एकदा मी ध्यानमंदिरात नामजप करत असतांना माझे ध्यान लागले. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले – ‘परात्पर गुरुदेव ध्यानमंदिरात ध्यानाला बसलेल्या प्रत्येक साधकाच्या आसंदीसमोर गेले. ते प्रत्येक साधकांसाठी नामजप होते आणि सर्व साधकांमध्ये भाव निर्माण करत होते. ते समोर असलेल्या साधकांवर प्रीतीचा वर्षाव करत होते.’ हे पाहून माझा भाव जागृत झाला आणि मला परात्पर गुरुदेवांची पुष्कळ आठवण आली.’
– कु. अपाला अमित औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |