विधानसभेसमोर नमाजपठण केल्याचा बनावट व्हिडिओ प्रसारित करणार्‍या धर्मांध महिलेच्या विरोधात गुन्हा नोंद

उजमा परवीन हिने ट्वीट करून अनेकांची केली दिशाभूल

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसक निदर्शनांच्या वेळी प्रकाशझोतात आलेली उजमा परवीन हिने एक ट्वीट करून अनेकांची दिशाभूल केली. तिने येथील विधानसभेसमोर नमाजपठण केल्याचा बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. यावर अनेकांनी तिचे कौतुक केले; मात्र पोलिसांनी उजमा परवीन हिचा खोटारडेपणा उघड करत तिने विधानसभा नाही, तर कबरीसमोर नमाजपठण केल्याचे सांगितले.

खोटा व्हिडिओ प्रसारित केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी उजमाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ‘उजमा परवीनने प्रसारित केलेला व्हिडिओ म्हणजे स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे’, अशी टीका अनेकांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.