अनेक वर्षांपासून देशात प्रतिवर्षी अनेक ‘रोपे ’ लावली जातात आणि भ्रष्टाचाराचा राक्षस पोसला जात आहे, त्यातील अधिकांश रोपांचे वृक्ष होऊ शकत नाहीत. मागील काही दशकात देशामध्ये जेवढ्या काही ‘रोपे लावण्याच्या योजना’ राबवण्यात आल्या, त्या जर भ्रष्टाचाराविना झाल्या असत्या, तर आज ही पर्यावरणाची समस्याच उद्भवली नसती. थोडक्यात सांगायचे झाले, तर सर्व प्रकारच्या प्रदूषणासाठी मूळरूपात मनुष्याचे धर्माचरणापासून दूर जाणे हेच उत्तरदायी आहे. भ्रष्टाचार असो किंवा भोगी प्रवृत्ती, हे धर्मापासून दूर जाण्याचेच परिणाम आहेत आणि म्हणून भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रदूषण या सर्वांचे उत्तर धर्मामध्येच आहे. सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठीही हिंदु धर्मराज्याची स्थापना अपरिहार्य आहे.’
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)