पाकिस्तानमध्ये हिंदु डॉक्टरची मुसलमान वाहनचालकाकडून हत्या

पाकमधील असुरक्षित हिंदू !

हत्या झालेले डॉक्टर धर्म देव राठी

हैदराबाद (पाकिस्तान) – येथे धर्म देव राठी (वय ६० वर्षे) या हिंदु डॉक्टरची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांचा वाहनचालक हनीफ लघारी याने केली. या हत्येच्या वेळी राठी यांचा स्वयंपाकी दिलीप ठाकूर हाही घायाळ झाला. त्यानेच हत्येची माहिती पोलिसांना दिली. डॉ. राठी चिकित्सालयातून घरी येत असतांना त्यांचा हनीफ याच्याशी वाद झाला. घरी पोचल्यानंतर हनीफ याने राठी यांची हत्या केली. डॉ. राठी यांचे कुटुंबीय अमेरिकेत रहातात.

१. या घटनेविषयी ‘यंग कंसल्टेंट्स असोसिएशन सिंध’ने दुःख व्यक्त केले आहे. या घटनेची योग्य चौकशी करून सत्य समोर यायला हवे. तसेच आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे संघटनेने म्हटले आहे.

२. सिंध प्रांतातील अल्पसंख्यांकांच्या प्रकरणांचे मंत्री ज्ञानचंद इसरानी यांनी म्हटले की, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

३. पाकिस्तानी खासदार खियल दास कोहिस्तानी यांनीही या हत्येचा निषेध केला आहे.