राबडी देवी यांच्या घरी जाऊन सीबीआयकडून चौकशी

भूमीच्या बदल्यात नोकरी दिल्याचे प्रकरण

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राजदचे वरिष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या घरी सीबीआयच्या अधिकार्‍यांनी जाऊन त्यांची चौकशी चालू केली आहे. रेल्वे विभागातील भूमी आणि नोकर भरती प्रकरणांत ही चौकशी केली जात असल्याची चर्चा आहे.

लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतांना (वर्ष २००४ ते २००९) या कालावधीत नोकरीसाठी भूमी घोटाळा झाला. यात लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीय यांच्यावर रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात भूमी घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने मे २०२२ मध्ये लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवलेला आहे.

(वर्ष २००९ मधील घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हा १३ वर्षांनी नोंदवला जातो, तर गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार, याची कल्पनाच करता येत नाही ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! – संपादक)