अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाचे न्यायमूर्ती शमीम अहमद यांची अपेक्षा !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – गाय अत्यंत पवित्र असून गोहत्या करणारे नरकात सडतात, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने व्यक्त केले आहे. न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी गोहत्येच्या संदर्भातील प्रकरणावर सुनावणी करतांना महंमद अब्दुल खलीक याची याचिका फेटाळून लागली. त्याला गोमांसासह अटक करण्यात आली होती. न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी म्हटले की, मला आशा आहे की, केंद्रशासन देशात गोहत्या रोखण्यासाठी योग्य निर्णय घेईल आणि गोवंशाला संरक्षित राष्ट्रीय पशू घोषित करील.
इलाहाबाद HC की लखनऊ पीठ ने कहा- गाय को संरक्षित राष्ट्रीय पशु घोषित करने की है जरूरत, केंद्र सरकार जल्द लें निर्णयhttps://t.co/VJ9kOL5bpj#UttarPradeshHindiNews #LucknowNews #AllahabadHighCourt #LucknowBenchofHighCourt #CentralGovernment #UPGovernment #Protec pic.twitter.com/sypMbugnHk
— Punjab Kesari (@punjabkesari) March 4, 2023
न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी सुनावणीच्या वेळी मांडलेली सूत्रे . . .
१. गायीला हिंदु धर्मामध्ये सर्व प्राण्यांमध्ये सर्वाधिक पवित्र मानले आहे. याला कामधेनु किंवा दिव्य गाय, तसेच ‘सर्व इच्छा पूर्ण करणारी’, असे म्हटले आहे.
२. पुराण सांगते की, गायींचे दान किंवा भेट देण्यापेक्षा अधिक धार्मिक काहीही नाही. भगवान श्रीरामांच्या वेळीही गायींना भेट म्हणून देण्यात आले होते. महाभारत भीष्म पितामह यांचे म्हणणे होते की, गाय जीवनभर मानवाला दूध देत असते. ही एका मातेप्रमाणे कार्य करते. यामुळेच ती जगाची माता आहे.
३. गायीला देवतांसमवेत जोडले जाते. यात विशेष करून भगवान शिव, भगवान इंद्र, भगवान कृष्ण, देवी यांच्याशी जोडले जाते.
४. गोवंशियांचे वैदिक काळापासून मनुस्मृति, महाभारत, रामायण आदींमध्ये धार्मिक आणि आर्थिक महत्त्व विशद करण्यात आलेले आहे. गायीपासून मिळणार्या पदार्थांमुळे पंचगव्य बनवले जाते.
५. जो गायींना मारतो किंवा दुसर्यांना मारण्याची अनुमती देतो, तो त्याच्या शरिरावर केस असेपर्यंत नरकात सडतो. गायीप्रमाणेच बैलालाही भगवान शिवाच्या वाहनाच्या रूपात दर्शवले आहे. बैल नर पशूंमध्ये सन्मानाचे प्रतीक आहे.
६. आम्ही एका धर्मनिरपेक्ष देशात रहात आहोत. येथे सर्व धर्मांचा सन्मान झाला पाहिजे. हिंदु धर्माचे मत आहे की, गाय दैवी आणि नैसर्गिक भल्याची प्रतिनिधी आहे. यामुळे तिची पूजा झाली पाहिजे.