द्रमुक सरकारकडून एका मंदिरात धार्मिक परिषदेच्या आयोजनावर निर्बंध !

तमिळनाडूतील कन्याकुमारी येथील मंडईक्कडू भगवती अम्मन मंदिरातील प्रकार !  

कन्याकुमारी येथील मंडईक्कडू भगवती अम्मन मंदिर

चेन्नई – तमिळनाडूतील कन्याकुमारी येथील मंडईक्कडू भगवती अम्मन मंदिरात ‘हैंदव सेवा संगम्’ या हिंदु संघटनेला धार्मिक परिषद आयोजित करण्यावर द्रमुक सरकारने निर्बंध आणले आहेत. या मंदिरात मागील ८० वर्षे ही परिषद आयोजित करण्यात येत होती. ब्रिटिशांच्या राजवटीत हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंचे धर्मांतर रोखणे, हा परिषद आयोजित करण्यामागील उद्देश होता.

वर्ष १९३६ पासून कोणत्याही अडथळ्यांविना ही परिषद मंदिरात आयोजित करण्यात येत होती; मात्र या वर्षी द्रमुक सरकारने, ‘मंदिरात कोणत्याही प्रकारचे खासगी कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत’, असे सांगत या परिषदेला अनुमती नाकारली. ‘हैंदव सेवा संगम्’ने परिषदेचे आयोजन करून त्याची कार्यक्रमपत्रिका प्रसारित केली होती. त्यासाठी मंडपही उभारण्यात आला होता; मात्र सरकारने ऐन वेळी परिषदेला अनुमती दिली जाणार नसल्याचे सांगितले.

संपादकीय भूमिका 

तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष ! तमिळनाडूत द्रमुक सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुविरोधी कारवाया वाढल्या आहेत. परिणामकारक हिंदूसंघटनाद्वारेच त्या रोखणे शक्य आहे !