भाजपचे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांचे निधन !

सुनील कामाठी

सोलापूर – येथील भाजपचे माजी नगरसेवक आणि खड्डा तालीम श्री शिवजन्‍मोत्‍सव मंडळाचे संस्‍थापक सुनील दशरथ कामाठी (वय ४३ वर्षे) यांचे २७ फेब्रुवारी या दिवशी उपचाराच्‍या वेळी निधन झाले. सुनील कामाठी यांच्‍या निधनाने त्‍यांच्‍या सहस्रो समर्थकांमध्‍ये शोककळा पसरली आहे.

सुनील कामठी यांनी खड्डा तालीमच्‍या माध्‍यमातून मोठे संघटन उभे केले होते. महाराष्‍ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील ६०० हून अधिक श्री शिवजन्‍मोत्‍सव मंडळांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्‍या सिंहासनाधिष्‍ठित मूर्तीचे वाटप आणि अन्‍य भरीव समाज कार्य यांमुळे ते लोकप्रिय होते.