आज ‘लव्ह जिहाद आणि लँड जिहाद मुक्त’ नवी मुंबईसाठी हिंदु समाजाचा जनआक्रोश मोर्चा !

नवी मुंबई, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – देशात वाढता लव्ह जिहाद आणि लँड (भूमी) जिहाद यांच्या विरोधात सकल हिंदु समाज यांच्या वतीने वाशी येथे भव्य जनआक्रोश मोर्च्याचे २६ फेब्रुवारी या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. वाशी येथील ब्ल्यू डायमंड हॉटेल, कोपरी नाका, सेक्टर २८ येथून दुपारी ३ वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या जनआक्रोश मोर्च्याची सांगता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे.

या मोर्च्याच्या पत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुण्यभूमीत आज लव्ह जिहाद, भूमी जिहाद आणि अवैध प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांनी उच्छाद मांडला आहे. हिंदु समाजाच्या मुली कधी नव्हे एवढ्या असुरक्षित झाल्या आहेत. कोणती हिंदु मुलगी अथवा महिला लव्ह जिहादला कोणत्या क्षणी बळी पडेल, याची शाश्वती उरलेली नाही.

मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करणारी भगिनी श्रद्धा वालकर ही लव्ह जिहादला बळी पडली आणि तिचे ३५ तुकडे करून फेकण्यात आले. तरीही आम्ही शांत बसलो. आमची ही शांतता म्हणजे आमची मूकसंमती असे जगाने गृहित धरले आहे.

आमच्या डोळयांसमोर नवी मुंबईत सरकारी भूमीवर अतिक्रमण करून बिनदिक्कतपणे अवैध प्रार्थनास्थळे बांधली जात आहेत. अवैध प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांतून पहाटेपासून रात्रीपर्यंत कानाचे पडदे फाटेपर्यंत अजान दिली जात आहे. तरीही आम्ही शांतच. आम्ही शांत म्हणून प्रशासनही शांतच बसले आहे. त्यामुळे या संदर्भात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी नवी मुंबईतील सकल हिंदु समाज रस्त्यावर उतरणार आहे.

आपल्या भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व हिंदु समाजाने जात, संप्रदाय, पक्ष, संस्था यांचे भेद बाजूला ठेवून पुष्कळ संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा राज्य सरकारच्या वतीने लागू करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा असणार आहे. सध्या नवी मुंबईत दर आठवड्याला लव्ह जिहादची एक घटना घडत आहे. जागा बळकावल्या जात आहेत. गरीब श्रमिक वर्गात आमीष दाखवून धर्मांतर केले जात आहे. याचा एकत्रित येऊन विरोध करणे आवश्यक आहे. त्यासाठी या मोर्च्याचे आयोजन केले आहे.