कॅनडामध्ये वाढत्या हिंदुद्वेषामुळे कॅनडातील नागरिक दुःखी आहेत ! – कॅनडातील खासदार चंद्र आर्य

कॅनडातील भारतीय वंशाच्या खासदाराकडून मंदिराच्या तोडफोडीचे सूत्र संसदेत उपस्थित !

उजवीकडे खासदार चंद्र आर्य

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील ब्रॅम्पटन शहरात हिंदूंच्या गौरीशंकर मंदिरात करण्यात आलेल्या तोडफोडीचे सूत्र भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य यांनी कॅनडाच्या संसदेत उपस्थित केले. यासह येथे खलिस्तान समर्थनांच्या घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या. भारतीय दूतावासानेही या घटनेचा निषेध केला होता.

खासदार चंद्र आर्य यांनी संसदेत म्हटले की, कॅनडामध्ये वाढत्या हिंदुद्वेषामुळे कॅनडातील नागरिक दुःखी आहेत. कॅनडा सरकारने हा घटना रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

संपादकीय भूमिका 

भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी देशातील आणि विदेशातील हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांचे सूत्र संसदेत अन् विधानसभेत उपस्थित करतात ?