परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले नियमित व्यायाम करण्याचे महत्त्व !

‘मी काही वर्षांपूर्वी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेथे रहात असतांना एकदा मी पहाटे ५ वाजता चालण्याचा व्यायाम करण्यासाठी आश्रमातून बाहेर गेलो आणि पाऊण घंट्याने आश्रमात परत आलो. दुपारनंतर मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. तेव्हा आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्री. अरुण डोंगरे

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘व्यायाम केला नाही, तर शरीर चांगले ठेवण्यासाठी साधना व्यय होते’, असे सांगणे

परात्पर गुरु डॉ. आठवले : आज सकाळी तुम्हाला आश्रमाच्या बाहेर फिरायला जातांना पाहिले.

मी : माझ्या मनात बर्‍याच कालावधीपासून शंका आहे की, ‘सकाळी अशा प्रकारे फिरणे किंवा नंतर व्यायाम करणे’, हे देहबुद्धी जोपासण्यासारखे आहे का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही व्यायाम केला नाही, तर शरीर चांगले ठेवण्यासाठी तुमची साधना व्यय होते. आम्ही ‘साधना व्यय न होता शरीर चांगले रहावे आणि परिणामकारक साधना करता यावी’, यासाठी इतकी औषधे घेतो; मात्र ‘१ घंटा व्यायाम करण्याची आवश्यकता असल्यास ४ घंटे फिरायला जाणे’, हे अपेक्षित नाही. साधनेच्या दृष्टीने शरीर चांगले रहावे; म्हणून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

गुरुदेवांनी सांगितलेले सूत्र लक्षात ठेवून मी नियमित आवश्यक तेवढा वेळ व्यायाम करतो. आता देवद आश्रमातील आम्ही काही साधक सकाळी ठरलेल्या वेळेत एकत्र येऊन सूर्यनमस्कार घालतो आणि प्राणायाम अन् आसने करतो.’

– श्री. अरुण डोंगरे (वय ७० वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१०.२०२२)