पूर्णिया (बिहार) येथे एका गावात मुसलमानाने घरावर फडकावला पाकिस्तानी झेंडा !

पूर्णिया (बिहार) – प्रजासत्ताकदिनी येथील सिपाही टोला गावातील महंमद अशफाक याने त्याच्या घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकावला. गावकर्‍यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी झेंडा उतरवला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. याविषयी अशफाक याच्या पत्नीने सांगितले की, तिचा पुतण्या मुबारक हुसेन याने हा झेंडा लावला. आम्हाला ‘हा  पाकिस्तानचा झेंडा आहे’, ही माहिती नव्हती.

संपादकीय भूमिका 

अशांना आता दिवाळखोरीकडे जात असलेल्या पाकिस्तानमध्ये भूकबळी जाण्यासाठी पाठवणेच योग्य शिक्षा ठरेल !