पालनपूर (गुजरात) येथील शाळेतील मंत्रोच्चारात चालणारी प्रार्थना बंद करण्याचा मुसलमानांचा प्रयत्न !

पालनपूर (गुजरात) – येथील ढोंडियावाडीमधील एन्. कोठारी प्राथमिक शाळेमध्ये मंत्रोच्चारात चालू असलेली प्रार्थना बंद करण्याचा प्रयत्न मुसलमानांकडून करण्यात आला. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या घटनेची माहिती शिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आली आहे. या शाळेत प्रतिदिन २० मिनिटे प्रार्थना घेतली जाते. ती बंद करण्याची मागणी शिक्षकांकडे मुसलमान करत होते. या शाळेत ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात, तांपैकी १७५ विद्यार्थी मुसलमान आहेत.

(शाळेमध्ये मंत्रोच्चारात चालू असलेली प्रार्थना बंद करण्यासाठी शिक्षकांशी वाद घालताना मुसलमान)

शाळेकडून शिक्षणाधिकार्‍यांना लेखी देण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, शाळेत प्रतिदिन सकाळी होणारी प्रार्थना शाळेजवळ रहाणार्‍यांना आवडत नाही आणि ते नेहमीच येथे अडथळे निर्माण करतात अन् प्रार्थना बंद करण्यास सांगतात.

संपादकीय भूमिका

प्रतिदिन दिवसांतून ५ वेळा मशिदींवरींल भोंग्यांवरून दिली जाणारी अजान गेली अनेक वर्षे हिंदू सहन करत आहेत, त्याचा विचार कोण करणार ?