बांगलादेशात मुसलमानांनी मंदिरांवर आक्रमण करून मूर्ती तोडल्या !

मुसलमानांनी आक्रमण करून तोडलेल्या मूर्ती

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील नेत्रकोना येथील पूरबाधला मार्केटमधील हिंदूंच्या मंदिरावर मुसलमानांनी आक्रमण करून तेथील सर्व मूर्ती तोडल्या. वसंत पंचमीला होणार्‍या श्री सरस्वतीदेवीच्या पूजेला विरोध करण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली आहे.

वरील छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. – संपादक

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशातील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने सातत्याने अशा घटना घडत आहेत. भारतातील हिंदू भारतातीलच मंदिरांचे रक्षण करू शकत नाहीत, ते बांगलादेशातील हिंदूंचे आणि त्यांच्या मंदिरांचे रक्षण करतील, अशी अपेक्षाही करता येत नाही ! त्यामुळे बांगलादेशात पुढेही अशाच घटना घडत रहाणार आहेत, हे वेगळे सांगायला नको !
  • बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध असूनही त्या त्यांच्या देशातील हिंदूंचे रक्षण करत नाहीत आणि भारत सरकारही त्यांच्यावर रक्षणासाठी दबाव निर्माण करत नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे !