हिंदूंवर होणारे आघात रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना हाच एकमेव उपाय ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

श्री शिव मंदिर जनसेवा समिती ट्रस्‍ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या वतीने आयोजित ‘हिंदु संमेलन’ !

हिंदु संमेलनात संबोधित करतांना श्री. नरेंद्र सुर्वे आणि कु. कृतिका खात्री

पानिपत (हरियाणा) – आज भारतात लव्‍ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद, वक्‍फ कायदे, धर्मांतरण, गोहत्‍या असे अनेक आघात हिंदूंवर होत आहेत. हे सर्व आघात रोखण्‍यासाठीचा एकच उपाय म्‍हणजे भारतात धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे होय, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. श्री शिव मंदिर जनसेवा समिती ट्रस्‍ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या वतीने १५ जानेवारी या दिवशी आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘हिंदु संमेलना’त ते बोलत होते. या संमेलनाला पानिपत येथील १५० हून अधिक स्‍थानिक धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्‍वनिष्‍ठ पुरुष आणि महिला उपस्‍थित होते.

या वेळी सनातन संस्‍थेच्‍या वतीने कु. कृतिका खात्री यांनी  ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ उपस्‍थितांना विशद केले.

विशेष

१. या कार्यक्रमाचे आयोजन हिंदु जनजागृती समितीच्‍या संकेतस्‍थळाचे वाचक श्री. गौरव दुबे आणि त्‍यांचे सहकारी श्री. मोहित तिवारी यांनी केले. तसेच सर्वश्री सुशील चतुर्वेदी, सुरेंदर शर्मा, पवन शर्मा, विनय बालियान, श्‍यामसुंदर शर्मा, पहलसिंग चव्‍हाण या स्‍थानिक धर्मप्रेमींनी सहकार्य केले.

२. संमेलनाच्‍या ठिकाणी जी समई लावली होती, त्‍यातील सर्व वाती संमेलन संपले, तरी तेवत होत्‍या. त्‍यामुळे अनेकांनी ‘आजचा कार्यक्रम पुष्‍कळ वेगळा होता. आजपर्यंत अनेक कार्यक्रमात समईची ज्‍योत शेवटपर्यंत कधीच रहात नाही’, असा अभिप्राय व्‍यक्‍त केला.