खडकी (जिल्हा पुणे) – येथे १७ जानेवारी या दिवशी दुपारी १ वाजता गोमांसाने भरलेला टेंपो खडकी पोलिसांच्या साहाय्याने जप्त करण्यात आला आहे. यामध्ये जवळ जवळ २ सहस्र किलो गोमांस होते. पोलिसांनी टेंपोचालक सय्यद अजीज आणि साहाय्यक तन्वीर कुरेशी यांच्याकडे या मांसाविषयी चौकशी केली असता त्यांनी गायी आणि बैल यांचे मांस सोलापूर येथून आणले असून ते मुंबई येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. या प्रकरणी मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी तक्रार प्रविष्ट केली असून सय्यद अजीज आणि तन्वीर कुरेशी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुणे येथे कत्तलीसाठी नेत असलेल्या ३ गोवंशियांची सुटका !
पौड (पुणे) येथे १६ जानेवारी या दिवशी गोरक्ष दलाचे राहुल कदम यांना ३ देशी गायी पुणे कँप येथे कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राहुल कदम, हृषिकेश कामथे आदी गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने गायींची सुटका केली, तसेच गायींना धन्वन्तरी गोशाळेत सोडण्यात आले आहे.
(गोवंश हत्या बंदी असूनही दिवसाढवळ्या गोवंशियांची हत्या होत आहे. कठोर कारवाई होत नसल्याने आडदांड प्रवृत्तीच्या कसायांना काहीच फरक पडत नाही. इच्छाशक्ती वाढवली, तर उत्तरप्रदेशप्रमाणे गोहत्या बंदी महाराष्ट्रातही होऊ शकते. गोहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून सर्व अवैध पशूवधगृहे बंद करावीत ! – संपादक)