म्हादई प्रश्नावर भाजप गंभीर ! – अधिवक्ता यतीश नाईक, प्रवक्ते, भाजप

पत्रकार परिषदेत डावीकडून अधिवक्ता यतीश नाईक, गिरीराज पै वेर्णेकर अणि आमदार प्रेमेंद्र शेट

पणजी, १६ जानेवारी (वार्ता.) – कायद्यानुसार जे करता येईल आणि करू शकतो, ते सर्व भाजपच्या शासनाने केले आहे. म्हादईला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सक्रीय राहून जे करता येईल, ते सर्व केले आहे, असे प्रतिपादन भाजपचे गोव्यातील प्रवक्ते अधिवक्ता यतीश नाईक यांनी केले. येथे म्हादई प्रश्नावर भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत भाजपचे अन्य एक प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर अणि आमदार प्रेमेंद्र शेट हे उपस्थित होते.

या वेळी प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले, ‘‘नुकतेच म्हादई प्रश्नावरून विरोधक आझाद मैदानात जमले होते. त्या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर संतापून विरोधकांनी ‘तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात का ?’, असा प्रश्न पत्रकारांना विचारला. विरोधकांकडे जेव्हा उत्तर नसते, तेव्हा ते असा अवमान करतात. म्हादईच्या संदर्भात विरोधक जे सभा घेत आहेत, त्यात त्यांचा राजकीय कार्यक्रम आहे.’’

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा