हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी घेतली भाजप आमदार राज सिन्‍हा यांची सदिच्‍छा भेट !

आमदार श्री. राज सिन्‍हा यांना ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देतांना उजवीकडे श्री. रमेश शिंदे

धनबाद (झारखंड) – येथील भाजपचे आमदार श्री. राज सिन्‍हा यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी सदिच्‍छा भेट घेतली. याप्रसंगी समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्‍वयक श्री. शंभू गवारे अन् श्री. अमरजीत प्रसाद उपस्‍थित होते. या वेळी श्री. शिंदे यांनी श्री. सिन्‍हा यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयीची भीषणता अवगत केली.

या वेळी श्री. शिंदे म्‍हणाले, ‘‘गेल्‍या काही काळापासून भारतात ‘हलाल’ उत्‍पादनांची मागणी करण्‍यात येत आहे. तसेच हिंदु व्यापाऱ्यांना व्‍यापार करण्‍यासाठी ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’सारख्‍या संस्‍थांकडून प्रमाणपत्र घेण्‍यास भाग पाडण्‍यात येत आहे. ‘हलाल अर्थव्‍यवस्‍थे’ला धर्माचा आधार असून ती अतिशय चतुराईने धर्मनिरपेक्ष भारतात लागू करण्‍यात येत आहे.’’

हा विषय ऐकून घेतल्‍यानंतर आमदार श्री. सिन्‍हा यांनी ‘याविषयी केंद्र सरकारला निवेदन पाठवून अन्‍वेषण करण्‍याची मागणी करू. तसेच हलाल प्रमाणपत्राविषयी समाजात जागृती करण्‍याठी प्रयत्न करू’, असे आश्‍वासन दिले.