१. नृत्य करतांना अपालाने देवीच्या तारक आणि मारक रूपांच्या भावमुद्रा क्षणार्धात साकारल्यावर मन अचंबित होणे
‘दसर्यानिमित्त सर्व साधकांना एक ध्वनीचित्र-चकती पहाण्याची संधी मिळाली. ही ध्वनीचित्र-चकती कु. अपाला औंधकर हिने ‘अयी गिरी नंदिनी …।’ या भक्तीगीतावर आधारित केलेल्या ‘भरतनाट्यम्’ या शास्त्रीय नृत्य प्रकाराची होती. या नृत्याच्या शेवटी अपालाने केलेल्या भावमुद्रा अचंबित करणार्या होत्या. पहिली भावमुद्रा असुरांचा संहार करणार्या देवीच्या मारक रूपाची होती, तर दुसरी भावमुद्रा कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्या देवीच्या तारक रूपाची होती. तिच्या पहिल्या भावमुद्रेतून पराकोटीचा क्रोध प्रक्षेपित होत होता, तर दुसर्या भावमुद्रेतून कृपा आणि प्रीती ओसंडून वहात होती. नृत्य करतांना भावमुद्रांतील हे पालट अपालाने क्षणार्धात घडवून आणले होते.
२. दैवी बालिका असलेल्या अपालाचे मन निर्मळ असल्याने ती परस्परविरोधी भावमुद्रा परिणामकारकतेने साकारू शकणे
यावर चिंतन केल्यावर आम्हाला असे जाणवले की, ‘भावमुद्रेचा उगम विचारांत, म्हणजेच मनात होतो. मन जेवढे निर्मळ, जेवढे स्वभावदोषरहित, तेवढी भावमुद्रांची परिणामकारकता अधिक असते ! अपाला दैवी बालिका असल्याने आणि ती स्वभावदोष निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असल्याने तिचे मन निर्मळ आहे अन् म्हणूनच ती परस्परविरोधी असणार्या भावमुद्रा परिणामकारकतेने साकारू शकली.’
– श्री. नितीन सहकारी आणि सौ. श्रुती सहकारी, फोंडा, गोवा. (१२.११.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |