अखंड सावधानता बाळगणे आवश्यक !

मुसलमानांनी चारही बाजूने देशाला घेरण्याचा सपाटा लावला आहे. ‘सर तन से जुदा’ (डोके शरिरापासून वेगळे करणे), दंगली, हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करणे, पोलिसांवर आक्रमण करणे, हिंदूंची मंदिरे मशिदीत रूपांतरित करणे, देशातील भूखंड स्वतःच्या नावावर करून घेणे, हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना जीवे मारणे किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे. अशा घटना आता वारंवार घडत आहेत. या सर्वांपासून हिंदू समाज, राष्ट्र, देवस्थाने, भूमी, मुली महिला यांना मुसलमानांपासून वाचवणे नितांत आवश्यक आहे. त्यासाठीच आपल्याला २४ घंटे डोळ्यात तेल घालून वावरले पाहिजे. सध्याच्या घटना पहाता आपल्यासाठी दिवस-रात्र वैर्‍याची झाली आहे.

१. अमानवीय आणि पाशवी वर्तन करणार्‍याला क्षमा का करायची ?

सर्वांत प्रथम आपल्याला कपटी आणि पाशवी वृत्तीच्या लोकांपासून स्वतःचा बचाव करायचा आहे. त्याचबरोबर त्यांच्याशी संघर्ष करून ही पाशवी वृत्तीच नष्ट करायची आहे. सर्वधर्मसमभाव, माणूस म्हणून सगळे सारखे, जातपात न मानणे, या गोष्टी निश्चित चांगल्या आहेत, यात वाद नाही. तथापि अशा संस्कारांत वाढलेल्या समाजाला फसवण्यासाठी, त्यांचे जीवन उध्वस्त करण्यासाठी जर कुणी अमानवीय आणि पाशवी वर्तन करत असेल, तर त्याला क्षमा करता येणार नाही.

श्री. दुर्गेश परुळकर

२. हिंदु मुलींनी स्वतःचा जीव धोक्यात का घालायचा ?

मुसलमान तरुण स्वतःचे नाव पालटून हिंदु नाव धारण करतात. हिंदु मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. नंतर स्वतःचे खरे रूप प्रकट करून त्यांना जीवे मारतात. अशा प्रकारे फसवणे, हा कायद्याने गुन्हा आहे. हे जरी सत्य असले, तरी आपण काहीही कारण नसतांना स्वतःचा जीव कशासाठी धोक्यात घालायचा ? हा खरा प्रश्न आहे.

३. जीवनात सावध रहाण्यासाठी घ्यावयाची काळजी

आजच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्या युगात आपण घराबाहेर न पडताही आपली फसगत होऊ शकते. म्हणून कोणत्याही अनोळखी माणसाशी आपण एकदम मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे नाहीत. हे पथ्य आपण पाळलेच पाहिजे. जोपर्यंत त्याच्या प्रामाणिकपणाची आपल्याला शतप्रतिशत निश्चिती पटत नाही, तोपर्यंत आपण स्वतःची कोणतीही माहिती कितीही जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार्‍या माणसाला द्यायची नाही. ही काळजी आपण घेतलीच पाहिजे. त्यासह त्याच्याशी संबंध न ठेवणे हेच उत्तम ! विशेषतः तरुण मुलींनी आपल्या पालकांपासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही.  पालकांनी आपल्या मुला-मुलींना अमर्यादित सूट देऊ नये. मुला-मुलींनीही आपल्या जीवनाचा कुणीतरी सत्यानाश करील, ही शक्यता लक्षात घेऊनच स्वतःही अत्यंत सावध रहावे आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराने वागू नये.

 ४. देश, संस्कृती आणि श्रद्धास्थाने यांच्याविषयी मुला-मुलींमध्ये निष्ठा निर्माण करायला हवी !

आपण आपल्या मुला-मुलींवर संस्कार करावेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंदसिंह, बंदा बैरागी यांसह अनेक वीरपुरुषांचे चरित्र ग्रंथ वाचायची सवय मुलांना लावली पाहिजे. आपला देश, संस्कृती, श्रद्धास्थाने यांच्या विरोधात जो वागेल किंवा बोलेल त्याच्याशी प्रितवाद करता आला पाहिजे. त्यासाठी मुलांमध्ये प्रतिकार निष्ठा निर्माण झाली पाहिजे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक अशा सर्व पातळ्यांवर मुलगा असो वा मुलगी सुदृढ अन् कणखर असलीच पाहिजे, याची काळजी घेणे काळाची आवश्यकता आहे.

५. सामाजिक संस्था, मंदिरे आणि शिक्षण संस्था यांचे राष्ट्रीय कर्तव्य

सामाजिक संस्था, मंदिर व्यवस्थापन, शिक्षण संस्था यांनी आपल्या विद्यार्थ्यांना याविषयी साक्षर करणे आणि कोणत्याही प्रलोभनाला वा आकर्षणाला भूलायचे नाही, ही शिकवण देणे अन् तसे संस्कार करणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य मानले पाहिजे. या कर्तव्याचे आपण सर्वांनी निष्ठेने पालन केले पाहिजे.

६. सर्वांना स्वसंरक्षण प्रशिक्षण द्यायला हवे !

त्यासह स्वसंरक्षणासाठी कशा प्रकारे आपण सिद्ध असले पाहिजे, याचे प्रशिक्षण अधिकृतपणे सर्व मुलांना देण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवरही होणे नितांत आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा पोचू शकेल, याची हमी देता येत नाही. म्हणून प्रत्येक तरुण, विद्यार्थी आणि नागरिक यांना स्वसंरक्षण शिबिरांमधून प्रशिक्षित करण्याची व्यवस्था करण्यात यावी.

 ७. प्रेमाच्या जाळ्यात फसवणार्‍यांना कायद्याचा धाक वाटण्यासाठी करावयाचा प्रयत्न

एवढ्यावरच न थांबता स्वतःचे नाव पालटून दुसर्‍यांना फसवण्यासाठी किंवा प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी जर कुणी प्रयत्न केला, तर त्याला तात्काळ कठोरात कठोर अशी शिक्षा करण्याची तरतूद आपल्या कायद्यात करायला हवी. अशा प्रकारे राष्ट्रघातक, समाजविघातक कृत्य करणार्‍या कोणत्याही गुन्हेगाराचे वकीलपत्र जो घेईल, त्याला बहिष्कृत करण्याचे काम समाजालाच करावे लागेल.

उत्तरप्रदेश राज्यशासनाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर प्रेयसीची हत्या करणार्‍यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा निर्णय घेतला आणि तो कार्यवाहीत आणला. त्याचे संपूर्ण देशातील राज्य सरकारांनी काटेकोरपणे अनुकरण केले पाहिजे. कायदा, न्यायव्यवस्था, समाजाची जागरूकता आणि प्रतिकारशक्ती यांचा धाक आता या नराधमांना वाटला पाहिजे.

८. पाशवी वृत्ती कायमची ठेचायला हवी !

साध्या भोळ्या लोकांना फसवून जीवे मारणे, हे पुण्य कृत्य नाही. म्हणून अशा क्रौर्याला दया दाखवणे, म्हणजे पेटता निखारा खिशात घालून फिरण्यासारखे आहे. शासनकर्त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि नागरिक, उगवती पिढी, विशेषतः तरुण-तरुणी यांच्या रक्षणार्थ कठोर निर्णय घ्यावा अन् पाशवी वृत्ती कायमची ठेचावी. यापुढे एकही हिंदू मुलगी आणि स्त्री यांची कुणाच्याही क्रौर्यामुळे हत्या होणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठीच अखंड सावध रहाणे नितांत आवश्यक आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२.१.२०२२)