PM Modi Sri Lanka Visit : श्रीलंकेने भारतीय मासेमारांची तात्काळ सुटका करावी !

पंतप्रधान मोदी यांची श्रीलंका दौर्‍यात मागणी  

पंतप्रधान मोदी

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या ३ दिवसांच्या दौर्‍यावर गेलेले पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रापती अनुरा कुमार दिसानायके यांच्यातील द्विपक्षीय चर्चेत भारतीय मासेमारांच्या अटकेवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा मासेमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. आम्ही मासेमारांना त्वरित सोडण्याबद्दल आणि त्यांच्या नौका सोडण्याबद्दल बोललो आहोत. या प्रकरणात आपण मानवतेने पुढे जायला हवे, यावर आम्ही सहमत आहोत.

श्रीलंकेचे सरकार तामिळी हिंदूंना असलेले अधिकार लागू करील, असा विश्वास !

श्रीलंकेतील तमिळी हिंदूंच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, श्रीलंकेचे सरकार तमिळी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करील आणि श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार त्यांना देण्यात आलेले पूर्ण अधिकार लागू करील, असा त्यांना विश्वास आहे.

पंतप्रधान मोदींना मित्र विभूषण पुरस्कार

पंतप्रधान मोदी व श्रीलंकेचे राष्ट्रापती अनुरा कुमार दिसानायके

तत्पूर्वी, श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मित्र विभूषण’ पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार श्रीलंकेचे नागरिक नसलेल्यांसाठी सर्वोच्च सन्मान आहे. यापूर्वी पॅलेस्टिनी नेते मेहबूब अब्बास आणि यासेर अराफत यांना हा सन्मान मिळाला आहे.

संपादकीय भूमिका

  • मुळात भारताच्या उपकारावर सध्या जगत असलेल्या श्रीलंकेने भारतीय मासेमारांना पकडण्याचे धाडसच करू नये, असे श्रीलंकेला भारताने बजावले पाहिजे !
  • श्रीलंका भारताच्या मासेमारांना पकडतो, याचा अर्थ तो भारताशी उद्धटपणे वागत असून तो भारताला किंमत देत नाही, असेच दाखवून देत आहे !