बालाकोटमध्ये २ आतंकवादी ठार

बालाकोट (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलांकडून राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. अद्याप शोधमोहीम चालू आहे. राजौरी येथे हिंदूंची हत्या करणार्‍या आतंकवाद्यांचा सुरक्षादलांकडून शोध घेतला जात आहे.