ब्रिटनमध्ये आधुनिक जीवनशैली आणि तंत्रज्ञान यांमुळे तरुणांची एकाग्रता अन् इच्छाशक्ती यांवर परिणाम !

लंडन –  ब्रिटनमध्ये आधुनिक जीवनशैली आणि तंत्रज्ञान यांमुळे तरुणांची एकाग्रता अन् इच्छाशक्ती यांवर परिणाम होत आहे, असे ‘सेंटर फॉर अटेंशन स्टडीज’ या संघटनेने केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. तंत्रज्ञानामुळे मेंदूचा अधिक वापर करावा लागत नसल्याने त्याचा परिणाम स्मरणशक्तीवरही होत असल्याचेही या संशोधनात दिसून आले.

या संशोधनात पुढे म्हटले आहे की, ‘मेंदूला सक्रीय ठेवण्याची तरुणांची क्षमता अल्प होत चालली आहे. मेंदूला फार गोष्टींचे स्मरण करण्याची आवश्यकता भासत नाही. ३६ वर्षांत प्रत्येकाचा मेंदू एखाद्या ‘ब्राऊझर’सारखा काम करू लागला आहे. त्याचा वाईट परिणाम त्यांच्या गुणवत्तेवर होत आहे.’

प्रत्येक ३ मिनिटांनी तरुणांचे मन भरकटते !

प्रत्येक ३ मिनिटांनी तरुणांचे मन भरकटते. सरासरी एक व्यक्ती दिवसभरात ८५ हून अधिकवेळा स्वतःचा भ्रमणभाष तपासते. अनेक प्रयत्न करूनही त्यांची ही सवय जात नाही.

संपादकीय भूमिका

आधुनिक विज्ञानाचे दुष्परिणाम ! कुठे मनुष्याचे व्यक्तीमत्त्व घडवणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कुठे त्याचे जीवन उद्ध्वस्त करणारी पाश्‍चत्त्य आधुनिक जीवनशैली !