खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात एन्.आय.ए.च्या १४ ठिकाणी धाडी !  

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’, ‘इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन’ आणि इतर खलिस्तानी आतंकवादी संघटनांच्या सदस्यांच्या देशातील १४ वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून शोधमोहीम राबवली. या धाडी २४ डिसेंबरला घालण्यात आल्या. यातून काही संवेदनशील कागदपत्रे मिळाली आहेत. खलिस्तानी आतंकवाद्यांकडून पंजाबमध्ये दहशत पसरवून वातावरण बिघडवण्याचा मोठा कट रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या धाडी घालण्यात आल्या.

एन्.आय.ए.ने दिलेल्या माहितीनुसार सीमाभागातून खलिस्तानी आतंकवादी आणि गुंडांना शस्त्रेे, स्फोटके आणि पैशांचा पुरवठा केला जात होता. या स्फोटकांच्या साहाय्याने हे आतंकवादी आणि गुंड देशाच्या विविध भागांत आतंकवादी कारवाया करत होते. तसेच देशाच्या अनेक भागात काहींना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याचाही कटही रचत होते. या प्रकरणी २० ऑगस्ट या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानुसार या धाडी घालण्यात आल्या.

link : दैनिक सनातन प्रभात

पंजाबमधील वाढता खलिस्तानी आतंकवाद देशासाठी धोकादायक !

https://sanatanprabhat.org/marathi/583242.html