चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड या देशांतून भारतात येणार्‍या प्रवाशांसाठी ‘आरटी-पीसीआर्’ चाचणी बंधनकारक !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – चीन आणि जपान या दोन्ही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारताने चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड या  देशांमधून येणार्‍या प्रवाशांसाठी ‘आरटी-पीसीआर्’ चाचणी बंधनकारक केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली.

मांडवीय म्हणाले की, या देशांतील ज्या प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळतील किंवा ज्या प्रवाशाची चाचणी सकारात्मक (पॉझिटीव्ह) येईल, त्या प्रवाशाला अलगीकरणात ठेवण्यात येईल. ‘एअर सुविधा’ हा अर्जही त्यांना भरणे सक्तीचे असणार आहे. यामध्ये त्यांना त्यांच्या प्रकृतीची सद्यःस्थिती नमूद करावी लागणार आहे.