पवना नदीपात्रातील जलपर्णी हटवण्याची मागणी !

हिंजवडी – पवना नदीपात्रातील रावेत बंधारा, तसेच परिसरातील पात्र जलपर्णीने आच्छादले आहे. जलपर्णी तात्काळ काढावी, अशी मागणी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांना युवा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवेदन देऊन केली आहे. जलपर्णी तात्काळ काढावी आणि जलपर्णीचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करून भविष्यात ती वाढणार नाही हे पहावे, अन्यथा आंदोलन करू, अशी चेतावणी या वेळी दिली.